अमृतसर : अमृतसरच्या खंडवाला परिसरात असलेल्या ठाकूरद्वारा मंदिरात स्फोट झाला आहे. हल्लेखोर मोटारसायकलवरून आलेले दोन तरुण होते. त्यांनी मंदिरावर बॉम्बसारखे काहीतरी फेकून हल्ला केला. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये हल्ला स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याची माहिती पोलिस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांनी दिली.
पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. यापूर्वी अमृतसर, पंजाबच्या इतर जिल्ह्यांमध्ये झालेले स्फोट पोलिस ठाण्याजवळ झाले होते. पुढारी १६.३.२५