वॉशिंग्टन (अमेरिका)- " पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने माझ्यावर धर्म पालटण्यासाठी वारंवार दबाव आणला. शाहिद आफ्रिदीसह अनेक खेळाडूंनी माझ्यासमोर अनेक अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे मी त्यांच्यासमवेत जेवण करणेही टाळत होतो", अशी माहिती हिंदू असलेले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी पुन्हा एकदा दिली. ते अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे वृत्तसंस्थांशी बोलत होते.
दानिश कनेरिया यांनी पाकिस्तानात होत असलेल्या हिंदुंवरील अन्यायाविरोधात आवाज उठवला. दानिश कनेरिया यांनी सांगितले की, त्यांना पाकमध्ये कधीच सन्मान आणि ओळख मिळाली नाही, जी त्यांना मिळायला हवा होती. आम्ही जागरूकता वाढवण्यासाठी आणि अमेरिकेला सांगण्यासाठी पुढे आलो आहोत, ज्यावरून कळेल की, आम्ही किती सहन केले आहे आणि त्यावर कारवाई केली जाऊ शकेल.
पुढारी १५.३.२५