सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीजवळील खनिज तेलाच्या नवीन साठ्यांचा शोध

Vartapatra    15-Mar-2025
Total Views |


Anya15.3.2025

 
   सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत अरबी समुद्रात नवे खनिज तेल साठे सापडले आहेत. त्यामुळे भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे. केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या या ठिकाणी लवकरच उत्खनन करणार आहेत. अरबी समुद्रात वर्षांपासून हे संशोधन सुरू होते.
 

   अरबी समुद्रात १८ हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात हे खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत! पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील समुद्रात ५३३८ चौरस किमी आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात १३१३१ चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आढळले आहेत. आता सापडलेल्या या तेल साठ्यामुळे भारतातील तेल उत्पादन तब्बल चार पटीने वाढण्याची शक्यता आहे! हे नवीन तेलसाठे भारताला तेल उत्पादनात आत्मनिर्भर बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.


नवराष्ट्र १२.३.२५