वणी (यवतमाळ): येथील दरबार चिस्ती हॉटेलमध्ये गोमांसयुक्त बिर्याणी विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावर त्याविषयी बजरंग दलाच्या गोरक्षकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांसमवेत बजरंग दलाचे ४ गोरक्षक तेथे गेल्यानंतर १०० हून अधिक मुसलमानांनी गोरक्षकांना पोलिसांसमोरच मारहाण केली. या वेळी एका गोरक्षकाला त्याचे कपडे फाडून मारहाण करण्यात आली. काही पोलीस गोरक्षकांना वाचवण्यासाठी गेल्यावर धर्माध मुसलमानांनी पोलिसांवरही हात उगारला. या मारहाणीत गोरक्षकांना डोळे, तोंड आणि पाठ येथे जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक धर्मांध मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
'याविषयी सीसीटीव्ही चित्रण पडताळून आरोपी मुसलमानांना अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी', अशी मागणी पीडित गोरक्षकांनी केली. याविषयी अपेक्षित गतीने पडताळणी न झाल्याने सकल हिंदु समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सनातन प्रभात १३/०३/२५