वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील नागरिकांना प्रवेश करण्यापासून रोखणार आहेत. सुरक्षेच्या कारणावरून ट्रम्प या २ देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्याच्या सिद्धतेत आहे. या संदर्भातील आदेश पुढील आठवड्यात काढण्यात येण्याची शक्यता आहे. यात अन्यही काही देशांचा समावेश असण्याची शक्यता - आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात ७ (इराण, इराक, लिबिया, सोमालिया, : सुदान, सीरिया आणि येमेन) इस्लामी देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती; मात्र वर्ष २०२१ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ही बंदी उठवली होती.
ट्रम्प यांनी अफगाणिस्तानवर बंदी घातली, तर सहस्रोंच्या संख्येने अमेरिकेत आलेल्या अफगाणी लोकांवर संकट कोसळणार आहे. तालिबान राजवटीमुळे ते लोक अफगाणिस्तान सोडून अमेरिकेत आले आहेत.
सनातन प्रभात ०८/०३/२५