सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न फसला

Vartapatra    12-Mar-2025
Total Views |

Dahshatwad
 
 
   भारत-पाकिस्तान सीमेवरील सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना खोरा पोस्टवर काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर त्यांनी काही राऊंड फायर केले. परिसरात शोधमोहीम सुरू असून सर्व जवानांना आणि परिसराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. बीएसएफचे डीआयजी, एसएसपी सांबा वरिंदर सिंग मन्हास यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून लक्ष ठेऊन आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, कुपवाडा जिल्ह्यात मंगळवारी दोघांचा मृत्यू झाला.
पाकिस्तानस्थित दहशतवादी मास्टर्सची लाखो रुपयांची संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे.
 
नवभारत १२/०३/२५