पूर्णिमा देवी बर्मन 'वूमन ऑफ द इयर'

SV    25-Feb-2025
Total Views |
 
भारतीय जीवशास्त्रज्ञ, वन्यजीव संवर्धक पूर्णिमा देवी बर्मन (वय ४५) यांचा 'टाइम' मासिकाने सन्मान केला आहे. यंदाच्या 'वूमन ऑफ द इयर'च्या यादीमध्ये जगाला आणखी चांगल्या आणि समतेच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या आणि नेतृत्वगुण दाखविणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला आहे.
पूर्णिमा देवी बर्मन या एकमेव भारतीय महिला 'टाइम' च्या २०२५च्या 'वूमेन ऑफ द इयर' च्या यादीमध्ये आहेत.

'हरगीला आर्मी'ची मदत

बर्मन यांना त्यांची 'हरगीला आर्मी' मदत करते. त्यांच्या या पथकामध्ये तब्बल २० हजार महिला पक्ष्यांसाठी काम करतात. पक्ष्यांचे घरटे वाचवितात आणि इतरांना त्याचे शिक्षण देतात. आसाममधून देशातील इतर भागांत त्यांच्या कार्याचा विस्तार होत आहे. आता कंबोडिया आणि फ्रान्समधील शाळांतही त्यांच्या कार्याची माहिती दिली जात आहे.

लोकसत्ता २२/०२/२५